Maxwell's Marvelous Match: A Testament to Overcoming Adversity-मॅक्सवेलचा अप्रतिम सामना: प्रतिकूलतेवर मात करण्याचा करार Mind Game UPSC MPSC Motivation

 जर असं कोणी म्हणत असेल की मला कंटाळा आलेला आहे, मी आजारी आहे, माझा हात दुखतो आहे, माझा पाय दुखतो आहे, तर त्याला याच्यापुढे प्रेमाने म्हणवे “तुझ्यात मॅक्सवेलचे जिगर संचारू दे” इतका अप्रतिम खेळ मुंबईत सात नोव्हेंबर रोजी पार पडला. 

    कोणत्याही बॅट्समनने दुसऱ्यांदा बॅटिंग करताना इतके रन्स केले नसतील इतकी रन्स त्याने  केले, हा एक रेकॉर्ड आहे.  पण याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे की सहा वेळा तो पिचवर पायात गोळे (cramps) च्या तीव्र वेदनांमुळे थेट आडवा पडला.  त्याला थोडा वेळ परत जाण्याचा सल्ला दिल गेला,पान त्याला हेही सांगण्यात आले की परत आल्यावर तू ह्याच वेगाने खेळू शकणार नाही.  परत जाण्याची संधी होती परंतु त्याला माहीत होतं की तो जर परत केला तर पूर्ण डाव उधळू शकतो. नाशिबाची ही थट्टा होती. परंतु हार मानेल तो Maxwell कसला? त्यावेळी त्याच्यात जी जिगर संचारली, ती जिगर म्हणजे अप्रतिम मानवाची उत्क्रांती आणि त्यांच्या क्षमतेची परिसीमा असेच म्हणावे लागेल. 


ऑस्ट्रेलियाचा स्कोर 91 रन्स वर सात आऊट आणि लक्ष 201 पाहिजे असे असताना मॅक्सवेल आला. ऑस्ट्रेलिया ल सेमी फायनल ला नेण्याची जबाबदारी त्याचेवर होती. तो जर आउट झाला असता तर पुढे बॅट्समन म्हणून कोणीच नव्हते. त्याच्या धडपडत केलेल्या 33 रन्स वर त्याला पहिल्यांदा एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर त्याच्या instinct वर त्याने थर्ड अंपायरच ऑपिनियन मागितलं, त्याला not out घोषित करण्यात आले. हा क्षण ज्याने ज्याने पहिले असले त्यांना ह्या क्षणी Maxwellने स्मित हास्य दिल्याचे पहिले असेल. कदाचित त्याला आपल्या सोबत आपले instint सोबत असल्याचे कळले असावे आणि इथेच “chemical locha” झाला. 

      तेव्हाच त्याने ठरवलं की अफगाणिस्तानी बॉलर्सचे pressure,दबाव झुगारून द्यायचं आणि मनमोकळेपणाने खेळायचं,आपल्या देशाला मानहानिकरक परभवातून बाहेर काढत,एक जगजेते प्रमाणे जिंकायचे, बस्स इतके ठरले असावे कारण पुढे तो जे खेळला आहे,ते ज्या कोणी पहिले असेल त्यांनी पापणे हलवले नसेल हे नक्की. इतके की star sports ने पुढे 3-4 ओवर दरम्यान एकही जाहिरात दाखविली नाही. संपूर्ण जगाने त्याचे वेदनेने कव्हळणे, धडपडणे पहिले असेल. आणि पुढे एक क्षणासाठी स्टेडियम सुद्धा स्तब्ध झाले होते, पण मग सुरू झाल्या Maxwell-Maxwell च्या घोषणा, जसे आपण सचिन-सचिन ऐकले असेल अगदी तसे. 

     Maxwell चक्क एका पायावर खेळला, त्याने 21 चौकार तसेच 10 षटकार मारले आणि नाबाद 201 धावा केल्या. पायाच्या वेदनांमुळे तो धावून एक-दोन runs घेऊ शकत नव्हताच. आणि शेवटच्या चेंडूवर एक षटकार मारून त्याने आपल्या देशाला, म्हणजे Australia ल सेमी फायनल साठी qualify केलेच, पण अनेक विक्रम देखील प्रस्थापित केले. 

1) 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानच्या फखर जमानच्या 193 धावांच्या रेकॉर्डला मागे टाकत 7 नोव्हेंबरच्या उल्लेखनीय कामगिरीने एकदिवसीय धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केल्याचा रेकॉर्ड देखील स्थापित केला. 

2) शिवाय, मॅक्सवेलच्या द्विशतकाने चार्ल्स कॉव्हेंट्रीच्या 2009 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या 194 धावांना मागे टाकले, ज्यामुळे Maxwell ची 7 नोव्हेंबरची धावसंख्या आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

3) एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सलामीवीर नसलेल्या खेळाडूने Maxwell ची 7 नोव्हेंबरची धावसंख्या आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

4) भारताच्या इशान किशनने मागील वर्षी बांगलादेशविरुद्ध फक्त 126 चेंडूंमध्ये सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम केला होता. आता मॅक्सवेलने फक्त 128 चेंडू घेत दुहेरी शतक पूर्ण केले. यामुळे एकदिवसीय इतिहासातील दुसरे सर्वात जलद द्विशतक ठरले आहे, 

5) मॅक्सजवेलचे षटकार मारण्याकत प्रवीणता या सामन्यात दहा षटकारांसह दिसून आली. या प्रभावी कामगिरीमुळे त्याच्या विश्वचषक कारकिर्दीत एकूण षटकारांची संख्या 33 पर्यंत वाढली, त्याने विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा खेळाडू म्हणून आपले स्थान निश्चित केले, भारतीय कर्णधार रोहित शर्मा (45) आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल (49) यांच्या मागे तो आहे.

6) त्याला साथ दिली कमिन्सने.  त्याने 48 बॉल मध्ये फक्त 14 runs  केले, अर्थात ते महत्त्वाचे होते, कारण की तिथे जर कोणी पदच्युत झाले असते तर हा एकटाच खेळू शकला नसता. कर्णधार पॅट कमिन्ससोबत २०२ धावांची भागीदारी – वनडे इतिहासातील आठव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. 

        Maxwellची ही अति उत्तम अशी कामगिरी असेच म्हणता येईल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर माणसाने ठरवले तर तू किती अति उत्तम उद्दिष्ट गाठू शकतो आणि त्यासाठी आकाश पाताळ एकत्र करून नशीब देखील तुमच्यासमोर नतमस्तक होते हा मर्फीचा सिद्धांत पुन्हा एकदा अधोरेखित झाला. इथेही असेच झाले, Maxwell ला एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चक्क तीन वेळा जीवनदान मिळाले. 

       मानवी मनांचा हा खेळ खेळताना असे जे जे मनुष्य जिंकलेले आहे त्यांना पुढे अनेक दशक अनेक शतक लक्षात ठेवली जाते त्यांचा उदो उदो खायला जातो अशीच एक खेळी कपिल देवांनी 1983 च्या वर्ल्ड कप मध्ये केली होती. त्यांनी 175 runs केले ज्यामुळे भारताला 5-17 वरून 8-266 अशी कामगिरी साधत बलाढ्य वेस्ट इंडिज ल पराभूत करून वर्ल्ड कप जिंकणे शक्य झाले होते.. ह्या कामगिरीची अर्थात आजही आठवण प्रेमाने, कौतुकाने काढतात आणि पुढे अनेक शतक दशक त्याची आठवण काढली जाईल. 

या खेळीमधून आपण काय शिकू शकतो?

•कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका.

•कठोर परिश्रम करा आणि आपल्या स्वप्नांना साध्य करण्याचा प्रयत्न करा.

•आव्हानाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार रहा.



Post a Comment

0 Comments